वैफल्यग्रस्त झाल्यानेच विरोधक देशातील संस्थांना बदनाम करताहेत; मुख्यमंत्री फडणवीसांची टीका
- dhadakkamgarunion0
- Mar 31
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
वैफल्यग्रस्त झाल्यानेच विरोधक देशातील संस्थांना बदनाम करताहेत; मुख्यमंत्री फडणवीसांची टीका
● देशातील संस्थांवर होणाऱ्या टीकेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘देशाच्या सर्व संस्थांना कलंकित करायचे, त्याच्यावर बोटे उचलायची, त्या संस्थांना एकप्रकारे अराजकाकडे न्यायचे हे चाललेले आहे. आपल्याला सत्तेत येता येत नाही मग अशाप्रकारे देशाच्या संस्था बदनाम करायच्या. या संस्था आपण जेव्हा बदनाम करतो, तेव्हा आपण संविधानावर अविश्वास दाखवतो. कारण या संविधानाने या संस्था निर्माण केल्या आहेत. या संस्था इतक्या भक्कम करण्यात आल्या आहेत की, त्या कोणी तोडू शकणार नाही. त्यामुळे कोणीही जन्माला आले तरी या संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे काही वाईट होऊ शकणार नाही.’ विरोधकांना सत्तेत येता येत नाही म्हणून ते देशातील संस्थांना बदनाम करत असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments