सुपारी घेऊन बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- dhadakkamgarunion0
- Mar 26
- 1 min read
Updated: Mar 27
[ पंचनामा ]
==================
सुपारी घेऊन बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
● स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले आहे की, 'सुपारी घेऊन कोणी बदनामी करत असेल, तर त्याला सोडणार नाही. अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.' कुणाल कामराचा इतिहास पाहिला, तर त्याने पंतप्रधान, न्यायमूर्ती यांच्याविषयी असभ्य भाषा वापरली आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो वादग्रस्त बोलतो. एकनाथ शिंदेंसारख्या लोकनेत्यावर इतक्या खालच्या दर्जाची कॉमेडी करणे हे अशोभनीयच आहे. म्हणूनच फडणवीस यांनी 'कोणी सुपारी घेऊन राज्यात वातावरण दूषित करत असेल, तर त्याला सोडणार नाही. ह्या लोकांना धडा शिकवावा लागेल. राज्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
-अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments