top of page
Search

८५ वर्षांनंतर नवे परिवहन भवन होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले भूमिपूजन

  • dhadakkamgarunion0
  • Mar 5
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

८५ वर्षांनंतर नवे परिवहन भवन होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले भूमिपूजन

● राज्याच्या परिवहन विभागाला आधुनिक सुविधांनी युक्त मुख्यालय मिळावे, या दृष्टीने ८५ वर्षांनंतर नव्या परिवहन भवनाच्या उभारणीस सुरुवात होत आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. फडणवीस म्हणाले की, परिवहन भवन या इमारतीसाठी चार मजल्याची परवानगी मिळाली असून पुढील परवानगीसाठी संरक्षण विभागाकडे प्रयत्न करण्यात येईल. तसेच परिवहन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याचे काम सुरू आहे. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विभागातील बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय. यामुळे आधीच्या गैरप्रकारांना आळा बसला. या सोबतच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘फेसलेस सेवा’ मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या असून, आजवर ४५ हून अधिक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. तसेच परिवहन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याचे काम सुरू आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page